भुसावळात सरकारी अधिकारी असल्याचे भासवत वृद्धाकडील 25 ग्रॅमचे दागिने लांबवले
भुसावळ (रविवार, 29 नोव्हेंबर 2026) : येथे खून झाला आहे, तुम्हाला माहिती नाही का ? अशी भीती घालत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाकडील 25 ग्रॅमचे दागिने लांबवले. ही धक्कादायक घटना गुरुवार, 26 रोजी नवनाथ नगर, शीतल हाईट, मेनवर रोडवर घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिकारी असल्याचे भासवून ठगवले
माँ भवानी जनरल स्टोअर्सचे संचालक हरिशंकर जमुनाप्रसाद पाल (63, भाजीनगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी 11.50 वाजेच्या सुमारास शहरातील नवनाथ नगराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन संशयीतांनी हिंदीतून संवाद साधत यहाँ मर्डर हूआ है, आपको मालूम नहीं क्या, असे म्हटल्यानंतर वृद्धाने माहित नाही, असे सांगितल्यानंतर संशयीतांनी आम्ही सरकारी अधिकारी आहोत, तुम्ही अंगावर दागिने घालून फिरू नका, आपके पास जितना सोना है, ओ हमारे पास देदो म्हटल्यानंतर वृद्धाने 10 ग्रॅमची दहा हजार रुपये किंमतीची अंगठी व 15 ग्रॅम वजनाची व 15 हजार रुपये किंमतीची चैन काढून दिल्यानंतर संशयीताने एका कागदात हे दागिने ठेवून पुन्हा पुडी वृद्धाकडे दिली मात्र काही वेळेनंतर वृद्धाने पुडी उघडली असता त्यात नकली धातूच्या दोन अंगठ्या व नकली पिवळ्या रंगाची चैन असल्याचे स्पष्ट होताच वृद्धाने पोलिसात धाव घेतली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत.
