बँकॉकहून पुण्यात आलेल्या महिलेकडून 72 लाखांचा गांजा जप्त

चिप्सच्या डब्याची तपासणी केल्यानंतर प्रकार उघड : संशयीताची कसून चौकशी


Ganja worth Rs 72 lakh seized from woman who arrived in Pune from Bangkok पुणे (12 डिसेंबर 2025) : बँकाकहून पुण्यात आलेल्या एका महिलेकडून तब्बल 72 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. चिप्सच्या डब्यात या महिलेने 722 ग्रॅम गांजा लपवला होता. पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने याबाबतची कारवाई केली. या महिलेची आता कसून चौकशी केली जात असून या प्रकारामागे कोण-कोण आहेत याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

चिप्सच्या डब्यात लपवला गांजा
पुणे विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 6 डिसेंबर रोजी पुणे विमानतळावर करण्यात आली. एअर इंडिया एक्सप्रेस आय एक्स 241 या विमानाने एक महिला प्रवासी बँकॉकवरुन पुणे विमानतळावर पोहोचली. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकार्‍यांनी त्या महिलेला चौकशीसाठी अडवले आणि तिच्या बॅगची तपासणी करायला सुरुवात केली. यावेळी त्यातील दोन चिप्सच्या डब्यात या महिलेने लपवलेला गांजा आढळून आला. त्याचे वजन केले असता ते 722 ग्रॅम इतके मिळून आले ज्याची बाजार भावानुसार 72.2 लाख रुपये किंमत आहे. संबंधित महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



722 ग्रॅम वजन असलेल्या गांजाची 72.2 लाख किंमत
विमानतळावर जप्त केलेल्या गांजाचे वजन 722 ग्रॅम इतके भरले. आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित बाजारभावानुसार या गांजाची किंमत 72.2 लाख रुपये इतकी मोठी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पुण्यात नेमका कशासाठी आणला जात होता आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !