साईंच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात : दोघे ठार
Devotees on their way to Sai Baba’s darshan meet in horrific accident: Two killed कारंजा (12 डिसेंबर 2025) : शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याने दोघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. समृद्धी महामार्गावर भरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव कार मागून धडकल्याने हा अपघात वाशिमच्या धनज गावाजवळ घडला.
असा घडला अपघात
भरधाव पिकअप मालवाहू वाहनाने अचानकपणे ब्रेक लावल्याने मागून येणारी भाविकांच भरधाव कार अनियंत्रित होऊन मागून जोरदार धडकली. या भीषण अपघात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघातात मंगेश नामक कार चालकाचा आणि विक्रम अशोकराव सौरगपते (40, रा. यवतमाळम) यांचा जागीच मृत्यू झाला. अनुकूल मनोज यादव (35, रा.दत्त चौक, यवतमाळ) व मयूर दीपक डोनाडकर (29, रा.दत्त चौक, यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले. दोघांना तत्काळ प्राथमिक उपचारासाठी कारंजा येथे हलविण्यात आले.









