विनयभंग प्रकरणातील नऊ वर्षांपासून पसार आरोपी मेहुणबारे पोलिसांच्या जाळ्यात


The accused, who had been absconding for nine years in a molestation case, has been caught by the Mehunbare police मेहुणबारे, ता.चाळीसगाव (13 डिसेंबर 2025) : विनयभंग प्रकरणाच्या गुन्ह्यातील संशयीताला तब्बल नऊ वर्षानंतर अटक करण्यात मेहुणबारे पोलिसांना यश आले. युवराज नामदेव पवार (रा.शिरसगाव, ता.चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नऊ वर्षांपासून आरोपीचा गुंगारा
हिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता मात्र तब्बल नऊ वर्षानंतरही संशयीत पवार हा गवसत नव्हता. संशयीत मुंबई येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मेहुणबारे पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे अंधेरी, मुंबई येथे सापळा रचून आरोपीस अटक केली.



यांनी केली कारवाई
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस हवालदार शांताराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार व संजय लाटे आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !