भरधाव दुचाकी धडकल्याने चोपडा तालुक्यातील तरुण ठार


A young man from Chopda taluka was killed when two speeding motorcycles collided अमळनेर (13 डिसेंबर 2025) : भरधाव दोन दुचाकींमध्ये धडक झाल्याने चोपडा तालुक्यातील घुमावलचा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवार, 12 रोजी दुपारी 12 वाजता तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ घडला. नरेंद्र प्रेमराज पाटील (रा.घुमावल ता.चोपडा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून अमळनेर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला अपघात
नरेंद्र प्रेमराज पाटील (रा.घुमावल ता.चोपडा) हा दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.ए.7986) ने अमळनेर येथे पैलाड भागातील राजेंद्र पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला आला असता सकाळी साडे अकरा वाजेला तो भेटून चोपडा येथे काम असल्याने परत चोपडा शहराकडे जाण्यासाठी निघाला. दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोपडाकडून अमळनेर येणार्‍या मोटरसायकल क्रमांक (एम.एच.19 ई.सी.2213) सोबत समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीस्वार जमिनीवर पडले.



मात्र नरेंद्र जागीच ठार झाला तर समोरील अज्ञात चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वाहनात घालून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. नरेंद्रच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. अमळनेर पोलिसात नरेंद्रचा चुलत भाऊ किशोर मोहन पाटील याने फिर्याद दिल्यावरून अज्ञात मोटरसायकलस्वारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !