18 वर्षीय तरुणी आधी होती बेपत्ता नंतर विहिरीतच आढळला मृतदेह
The 18-year-old girl, who was initially reported missing, was later found dead in a well. अमळनेर (13 डिसेंबर 2025) : अमळनेर तालुक्यातील गांधली येथून 10 डिसेंबर रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह 12 रोजी गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली जयश्री संजय संदानशीव (18) असे मयत तरुणीचे नाव आहे.
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला
जयश्री ही बारावीचे शिक्षण घेणारी तरुणी बुधवार, 10 रोजी दुपारी कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोधमोहीम राबवली मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही मात्र शुक्रवार, 12 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जयश्रीच्या वडिलांना गांधली येथील सुनील पाटील यांचा दूरध्वनी आला. त्यांनी गावातीलच धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली.


मृतदेहावर काळ्या रंगाची ओढणी दिसत असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता विहिरीतील मृतदेह जयश्रीचाच असल्याची खात्री झाली. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार गणेश पाटील करीत आहेत.







