जळगावात धाडसी घरफोडी : 50 हजारांचा ऐवज लंपास


Daring burglary in Jalgaon : Valuables worth 50000 stolen जळगाव (15 डिसेंबर 2025) : जळगावच्या सुप्रीम कॉलनीत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनपी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा एकूण 49 हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. घरफोडीची घटना रविवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
शरीफ मुराद खाटीक (52, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांचे घर 13 ते 14 डिसेंबरच्या कालावधीमध्ये बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेऊन बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील गोदरेज कपाटामधून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण 49 हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. हा प्रकार रविवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता समोर आला. या संदर्भात रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण चौधरी करीत आहे.



 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !