नवीन वीज मीटरसाठी दोन हजारांची लाच भोवली : जळगावातील वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात


Accepting a bribe of two thousand rupees for a new electricity meter proved costly: a senior technician from Jalgaon caught in the ACB’s trap जळगाव (15 डिसेंबर 2025) : नवीन वीज मीटरसाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे (57) यास जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या मुलांच्या नावे नवीन वीज मीटर हवे असल्याने त्यांनी वायरमन व तंत्रज्ञ लोंढे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी चार हजार रुपये लागतील सांगितल्याने त्यांनी रक्कम दिली होती मात्र त्यानंतरही वीज मीटर बसवण्यात न आल्याने त्यांनी पुन्हा लोंढे यांना विचारणा केली असता लोंढे यांनी पुन्हा दोन हजार रुपये लागतील म्हणून सांगितल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली व सोमवार, 15 रोजी सायंकाळी सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच लोंढे यास अटक करण्यात आली.



यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !