चाळीसगाव तालुक्यातील बेपत्ता बालिकेचा विहिरीत आढळला मृतदेह


The body of the missing girl from Chalisgaon taluka was found in a well चाळीसगाव (16 डिसेंबर 2025) : चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातील नऊ वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही बेपत्ता बालिका चार दिवसानंतर विहिरीत मृतावस्थेत आढळली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

चार दिवसांपासून तरुणी होती बेपत्ता
धनश्री शिंदे ही गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी चार वाजून 55 मिनिटांनी ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूने जाताना दिसली मात्र त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.



धनश्रीचा कसून शोध घेत असताना, गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे शालेय दप्तर आढळून आल त्यामुळे कुटुंब आणि गावकर्‍यांनी मुलीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला होता आणि चाळीसगाव तालुका पोलिसात गुन्हाही दाखल केला.

अपहरणाचा संशय बळावत असतानाच, सोमवार, 15 डिसेंबर रोजी गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने तरवाडे बुद्रुक येथे दाखल झाले असून तपासाला वेग देण्यात आला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !