आधी ‘रमी’ मुळे व आता सदनिका घोटाळ्याने वाढवली अडचण : माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात


First the ‘Rummy’ controversy and now the apartment scam have increased the trouble: Manikrao Kokate’s ministerial position is in jeopardy. मुंबई (17 डिसेंबर 2025) : अजितदादा गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद दुसर्‍यांदा धोक्यात आले असून नशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी माणिकराव कोकाटे हे सदनिका घोटाळाप्रकरणी दोषी असल्याचा प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत त्यांची दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही कायम ठेवल्याने कोकाटे यांना क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे शिवाय त्यांच्यावर अटकेची टांगती तलवारही कायम आहे.

रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल
सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे संकटात सापडले होते. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधकांनी प्रचंड दबाव निर्माण केला होता परंतु अजित पवार यांनी त्यावेळी माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद काढून घेत त्यांना क्रीडामंत्री केले मात्र आता जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

आज अजित पवारांच्या भेटीत होणार चर्चा
बुधवारी मुंबईत माणिकराव कोकाटे हे राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेणार असून ेटीत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण वरिष्ठ कोर्टात जाऊ, असे सांगून माणिकराव कोकाटे अजितदादांकडून अभय मागू शकतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई व्हावी, असा मतप्रवाह नाही तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्यास विपरीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे त्यामुळे आता अजित पवार हे गेल्यावेळप्रमाणे माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा पाठीशी घालणार की त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !