कलाकेंद्रात काम देण्याच्या बहाण्याने तरुणीवर सामूहिक अत्याचार


A young woman was gang-raped under the pretext of being offered a job at an art center बीड (17 डिसेंबर 2025) : कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली असून चौघांविरोधात बारामती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले तरुणीसोबत
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील एका महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने तक्रारदारांशी संपर्क साधला होता. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आमिष बदामबाईने दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली. मात्र मुलीला अंबाजोगाई येथील ‘पायल कलाकेंद्र’ येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली.



या मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील ’साई लॉज’वर नेले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कलाकेंद्रात सोडले व व वेश्याव्यवसाय करण्यास बळजबरी प्रयत्न झाला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !