बोदवड तालुक्यात चोरटे सैराट : एकाचवेळी सात घरांसह किराणा दुकान फोडले


Thieves are running rampant in Bodwad taluka: Seven houses and a grocery store were burgled simultaneously. बोदवड (17 डिसेंबर 2025) : बोदवड तालुक्यातील मनुर येथे मंगळवारी रात्री एकाच वेळी सात घरांसह एका किराणा दुकानाला टार्गेट करीत चोरट्यांनी तब्बल तीन तोळे सोने व 50 हजारांहून अधिक रोकड लंपास केल्याने गावकरी धास्तावले आहे. अशा पद्धत्तीने एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर चोर्‍या झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले.

एकाचवेळी सात घरे टार्गेट
विठ्ठल ओंकार शेळके यांच्या घरातील सदस्य बाजूच्या खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी घरातील रोकड चोरून नेली तसेच कपाटातील साहित्याची नासधूस केली. संतोष वामन वाघ यांच्या घरातून सुमारे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. देवकाबाई प्रकाश देवकर यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. याचबरोबर बाबूराव पाटील, विलास देवकर, कैलास शेळके आणि सीताराम तुकाराम सोनवणे यांच्या घरातही चोरी करण्यात आली.



ज्या घरांमधून काही हाती लागले नाही, त्या ठिकाणी चोरट्यांनी कपाटातील साहित्य फेकाफेक करत मोठ्या प्रमाणात नासधूस केली. सकाळी नेहमीप्रमाणे घरमालक झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या चोरीच्या घटनांची माहिती मिळताच पोलिस पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांना कळविले. यासंदर्भात बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !