घरफोड्या करणार्या आंतरराज्यीय गुन्हेगारांची टोळी धुळे तालुका पोलिसांच्या जाळ्यात
सहा गुन्ह्यांची उकल : 16 लाखांचा मुद्देमाल यंत्रणेकडून जप्त
कुसूंब्यातील घरफोडी उघड
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील वसंतराव राजाराम चव्हाण यांच्या घरातून चार लाख 78 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरट्यांनी लांबवले होते शिवाय परिसरातील नेर, अकलाड, मोराणे व कुंडाणे गावातही घरफोड्या झाल्याने ग्रामस्थ धास्तावले होते.



आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टोळी जाळ्यात
सातत्याने सुरू असलेल्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगार, परिसरातील सीसीटीव्ही, फॉरेन्सिकची मदत तसेच खबर्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून धुळे तालुका पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. परिसरातील तीन राज्यांच्या सीमेवरील तब्बल 375 सीसीटिव्हींची पडताळणी पोलिसांनी केल्यानंतर पोलिसांनी 17 दिवस सातत्य व पाच दिवसांचा प्रवास करीत गुजरात-मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील दाहोद व गोधरा जिल्ह्यातून संशयीताच्या मुसक्या बांधल्या. आरोपींनी सहा गुन्ह्यांची कबुली देत तब्बल 12 तोळे सोने काढून दिले आहे शिवाय गुन्ह्यातील वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे आरोपींची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना पोलिसांनी केलेली कारवाई निश्चितच उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या ार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, हवालदार नितीन चव्हाण, उमेश पवार, कुणाल शिंगाणे, गजेंद्र मुंडे, राहुल देवरे, प्रतीक देसले, राजू पावरा, जयकुमार चौधरी, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज बाविस्कर व हवालदार मनोज बाविस्कर करीत आहेत.







