नऊ वर्षानंतर माजी आमदार चौधरी पालिकेत : भुसावळ पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा गायत्री भंगाळे यांनी स्विकारला पदभार


After nine years, former MLA Chaudhary returns to the municipality: Gayatri Bhangale assumes charge of the Bhusawal Municipal Council’s mayor’s post भुसावळ (24 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या नुतन लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून गायत्री चेतन भंगाळे यांनी मंगळवार , 23 डिसेंबर रोजी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. यावेळी पालिका कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमास माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नगरसेवक उल्हास पगारे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रखडलेल्या कामांना चालना देणार
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणीपुरवठ्यासह स्वच्छता, रस्ते, आरोग्य आदी मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन भुसावळच्या विकासाला गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आता विकासकामांसाठी ट्वेंटी-ट्वेंटी’चा सामना
माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत भुसावळच्या रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी ट्वेंटी-ट्वेंटी’चा सामना खेळणार असल्याचे सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्याधिकार्‍यांनी केले स्वागत
कार्यक्रमास मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्षा भंगाळे यांनी पालिकेच्या विविध विभागांची कार्यपद्धती अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. या प्रसंगी नगराध्यक्षा भंगाळे यांचे सासरे नारायण भंगाळे,पती चेतन भंगाळे,वडील रूपचंद गौर यांच्यासह भंगाळे व गौर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तसेच उपमुख्याधिकारी परवेझ अहमद, कार्यालय अधीक्षक वैभव पवार यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !