यावल-फैजपूर रस्त्यावर पूर्व वनविभागाच्या कारवाईत अवैध लाकूड वाहतूक करणारे ट्रक पकडला
यावल (29 डिसेंबर 2025) : यावल-फैजपूर रस्त्याने गस्त करीत असतांना वनविभागाच्या पथकाने ट्रक (क्रमांक एम.एच.१९ झेड. २४९९) हे वाहन पकडले. वाहनांची तपासणी केली असता वाहणात निंब, बाभूळ सह आदी प्रजातीचा जळाऊ लाकूड मिळुन आले.

वाहन चालक शेख मोहिनुद्दीन शेख उद्बोदिन (रा.रावेर) याच्याकडे मालाची वाहतूक पासबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना मिळून आला नाही. सदरील वाहन तसेच जळाऊ लाकूड असा एकूण चार लाख ६० हजार २४८ इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
