भाजपाचा आक्रमक चेहरा असलेल्या युवराज लोणारींना भुसावळात गट नेतेपदाची संधी
Yuvraj Lonari, a prominent and aggressive face of the BJP, has been given the opportunity to become the group leader in Bhusawal भुसावळ (30 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेत गेल्या 30 वर्षांचा राजकिय अनुभव असलेले अभ्यासू व तितकेच आक्रमक असलेल्या युवराज लोणारींना भाजपने गटनेता पदाची संधी दिली आहे. विरोधी गटाकडे केवळ 12 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यामुळे आगामी काळात गटनेते पदावरील लोणारींना सर्वांना एका सुत्रांत जोडून ठेवण्याचे आव्हान राहिल.
काही महत्वाच्या बैठकींना उपस्थिती, अनुपस्थिती, कोरमपूर्ती आदींचा ताळमेळ साधावा लागणार आहे. पालिकेचा चांगला अभ्यास असल्याने युवराज लोणारी यांना ही संधी देण्यात आली आहे. यामुळे भाजपला नक्कीच फायदा होईल, असे चित्र आहे. यासोबतच उपगटनेता म्हणून तरुण व लेवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधीत्व करणार्या परिक्षीत बर्हाटे यांना संधी दिली आहे. यामध्ये भाजपने सर्वसमावेशकता आणण्याचे प्रयत्न केले आहेत.

