भुसावळातील नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेस, राष्ट्रवादी बसपाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त


In the mayoral election in Bhusawal, the security deposits of the Congress, NCP, and BSP candidates were forfeited भुसावळ (30 डिसेंबर 2025) : पालिकेच्या चुरशीच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगरसेवक पदाच्या 240 उमेदवारांपैकी तब्बल 131 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली तर नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या पराभुत उमेदवार रजनी सावकारे वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, बहुजन समाज पार्टी व तीन अपक्ष अशा सहा उमेदवारांची अनामत जप्त करण्यात आली. निवडणुकीत मोठ्या राजकिय पक्षांनाही अनामत जप्तीची वेळ आली.

अनामतही झाली जप्त
पालिकेच्या चुरशीच्या लढतीमध्ये अनेक मातब्बर उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार रिंगणात होते. यातील प्रमुख पराभूत भाजप उमेदवार रजनी सावकारे यांची एकमेव जागेची डिपॉजीट वाचली. उर्वरित सर्व उमेदवारांना 12 हजार 261 पेक्षा कमी मतदान असल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आर्शिया अन्सारी, बहूजन समाज पार्टीच्या किर्ती वानखेडे, राष्ट्रीय काँग्रेसच्या सविता सुरवाडे, अपक्ष उमेदवार ज्योती समशेर, अलका सुरवाडे व पुष्पा सोनवणे यांचीही अनामत रक्कम जप्त झाली आहे.

प्रभाग 15 मध्ये सर्वाधिक 14 जणांच्या अनामत जप्त
शहरातील मुस्लिम बहूल असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मधील अ जागेसाठी आठ उमेदवार तर ब जागेसाठी10 उमेदवार रिगणांत होते. या प्रभगाातील अ जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. तर उर्वरित सर्व सात जागांवरील उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या. तर ब जागेसाठी दहा पैकी एका अपक्ष उमेदवारांची अनामत वाचली उर्वरित सर्व आठ उमेदवाराच्या अनामती जप्त झाल्या. या प्रभागात एकूण सर्वाधिक 14 उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या आहेत.

मोठ्या फरकाने पराभव पण डिपॉजीट वाचले
प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजप विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. या लढतीमध्ये भाजपच्या उमेदवाराला 1443 मते मिळून मोठ्या फरकाने विजय झाला. एकूण 1809 वैध मते होती. यापैकी 1/7 म्हणजे 226 पेक्षा कमी मते असलेल्या उमेदवाराचे डिपॉजीट जप्त होणार होते मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला 322 मते मिळाली. यामुळे मोठ्या फरकाने पराभव होऊनही उमेदवाराचे डिपॉजिट वाचले.

या प्रभागांत राजकिय पक्षांच्या अनामती जप्त
भाजप – शहरातील प्रभाग क्रमांक तीन अ, तीन ब, प्रभाग 12 अ व ब, प्रभाग 16 अ व ब, प्रभाग 17 ब, प्रभाग 18 अ व ब, प्रभाग 19 अ व ब, या प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली.

राष्ट्रवादी शरद पवार गट – प्रभाग तीन ब, प्रभाग 4 ब, प्रभाग 7 ब, प्रभाग आठ अ आणि ब, प्रभाग 10 ब, प्रभाग 11 अ, प्रभाग प्रभाग 20 ब, प्रभाग 22 अ या जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अनामत गमावली आहे.

राष्ट्रीय काँग्रेस – प्रभाग क्रमांक 2 अ, प्रभाग सहा अ प्रभाग आठ ब, प्रभाग 10 अ, प्रभाग 12 ब, प्रभाग 14 ब, प्रभाग 15 अ व ब, प्रभाग 16 अ व ब, प्रभाग 17 अ व ब, प्रभाग 19 ब, प्रभाग 20 ब या जागांवरील अनामत जप्त झाली.

राष्ट्रवादी अजिीत पवार गट – प्रभाग सह ब व अ, प्रभाग आठ अ आणि ब, प्रभाग 11 अ आणि ब, प्रभाग 13 अ, प्रभाग प्रभाग 15 अ, प्रभाग 20 अ, प्रभाग 21 अ या जागांवर उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त झाल्या आहेत.

काय आहे नियम
उमेदवार पराभुत झाल्यास आणि त्याला एकूण वैध मतांच्या 1/8 पेक्षा अधिक मते मिळाली नसल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते. महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 14(4) प्रमाणे ही कारवाई केली जाते. या नुसार अनामती शासनाने जप्त केल्या आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !