यावलला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गळाला लागला अपक्ष : गटनेतेपदी वर्षा चोपडे
In Yaval, an independent candidate has joined the NCP Ajit Pawar group : Varsha Chopade appointed as the group leader यावल (31 डिसेंबर 2025) : यावल नगरपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गळाला एक अपक्ष उमेदवार लागला व त्यांनी मंगळवारी पक्षाचे तीन नगरसेवक व एका अपक्षाला सोबत घेऊन चार जणांचा गट स्थापन केला. भाजपा पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गटनेतेपदी वर्षा आकाश चोपडे यांची वर्णी लागली.
राष्ट्रवादीकडून गट स्थापना
यावल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सहा जागा लढवण्यात आल्या. त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या व नगरपालिकेत प्रथमच अजित पवार गटाने खाते उघडले. त्यासोबतच त्यांनी या निवडणुकीत विजयी झालेल्या चार अपक्षांपैकी करीम कासम कच्छी यांना सोबत घेऊन गटाची स्थापना केली. चार पैकी एकाला राष्ट्रवादीने गळाला लावले असून चौघांचा गट मंगळवारी स्थापन झाला. या गटाच्या गतनेता म्हणून वर्षा आकाश चोपडे यांची निवड झाली. या गटामध्ये गटनेता चोपडे सह उपगटनेता अंजुम बी.कदीर खान, आमेनाबी शाकीर खान व करीम कच्छी असे चार नगरसेवक आहेत.

उबाठा, काँग्रेस व अपक्षांच्या गटाची उत्सुकता
नगरपालिकेत भाजपाने आठ नगरसेवकांचा एक गट स्थापन केला आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाने चार नगरसेवकांचा गट स्थापन केला. शिवसेना उबाठासह काँग्रेस आणि उर्वरित तीन अपक्ष हे कुठे व कोणासोबत जातात ? ते कसे गट स्थापन करतात याकडे देखील आता लक्ष लागले आहे.
