खासदार चषक स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयाचा डंका : सर्वच स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक
Nahata College shines in the MP Cup competition : Secures first place in all events भुसावळ (31 डिसेंबर 2025) : भुसावळातील मध्य रेल्वेच्या मैदानावर झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात नाहाटा महाविद्यालयातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी व बॉक्सिंग या सर्व स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाने मिळवले यश
19 वर्ष वयोगटातील संघांमध्ये मुलींच्या आठ संघातून महाविद्यालयीन संघ विजयी झाला तसेच बॅडमिंटन मुलींचे चार संघातून प्रथम क्रमांकाने महाविद्यालयीन संघ विजयी झाला व मुलांच्या सहा संघातून उपविजयी झाला तसेच कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींचा व मुलांचा महाविद्यालयीन संघ उपविजयी राहिला.

विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक तसेच चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.आर. वाणी, उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील तसेच क्रीडा शिक्षक प्रा.मनोज वारके यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
