नव वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत करू या : भुसावळात नशाबंदी मंडळाचा उपक्रम


Let’s welcome the new year in sobriety, not in intoxication : An initiative by the Prohibition Committee in Bhusawal भुसावळ (31 डिसेंबर 2025) : नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्हा टाटा मॅजिक टॅक्सी परवानाधारक चालक-मालक संघटना तसेच दिशा सोशल फाउंडेशनतर्फे नववर्षाचे स्वागताचे आयोजन हे गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे, सालाबादप्रमाणे. बुधवार, 31 डिसेंबर रोजी संघटना प्रबोधनात्मक बॅनर टाटा- मॅजिक गाडीवर लावून टॅक्सी चालक, प्रवासी व जनतेत प्रबोधन करीत आहे, बुधवारी सकाळी 11 वाजता पांडुरंग टॉकीज चौकात भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांचे संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील सचिव चंद्रकांत चौधरी व कार्याध्यक्ष दिनेश भंगाळे, उपाध्यक्ष धनराज सोनवणे यांनी स्वागत केले. यावेळी गाडीवर बॅनर लावून जनप्रबोधन अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोस्टर प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संस्था संघटना सामाजिक संस्था चे प्रतिनिधी गाडीचे चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणार्‍या नवीन वर्षात दारू किंवा कोणतेही व्यसन करणार नाही, असा संकल्प करून आवाहन करण्यात आले व सर्वांनी मिळून तशी प्रतिज्ञा घेतली व व्यसनाला बदनाम करण्यात आले. प्रसंगी उपस्थित बारबोले यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. वाहतूक नियमांचे शहरवासीयांनी पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संघटनेतर्फे दिनेश भंगाळे यांनी प्रबोधनात्मक मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन चंद्रकांत चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी संघटनेचे धनराज सोनवणे, लक्ष्मण चौधरी, प्रकाश कोळी, चंदू पाटील, लक्ष्मण भोळे, कपिल चौधरी, जगदीश खैराडे, प्रदीप चौधरी, कपिल चौधरी, संतोष भोई, गजानन हेंडे, दीपक सोनवणे, बबलू सुतार, जयराज सोनवणे, अनिल चौधरी, कॉन्स्टेबल संकेत झांबरे आदींनी परिश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !