यावल तालुका यावल विभाग पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी पंकज बडगुजर
उपाध्यक्षपदी चंदन पाटील यांची निवड
Pankaj Badgujar has been elected as the president of the Yaval Taluka Yaval Division Police Patil Association यावल (3 जानेवारी 2026) : यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात गुरूवारी यावल तालुका यावल विभाग पोलिस पाटील संघटनेची बैठक झाली. यात यावल विभाग तालुकाध्यक्ष पदी पंकज बडगुजर तर उपाध्यक्षपदी चंदन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पदाधिकारी बिनविरोध
सालाबादाप्रमाणे गाव कामगार पोलीस पाटील संघाची वार्षिक बैठक राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत यावल तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सावखेडासीम पोलिस पाटील पंकज बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात तर सातोद पोलिस पाटील चंदन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.





या पदाधिकार्यांची निवड
कार्यकारीणी कार्याध्यक्ष अर्चना दीपक पाटील, सचिव विठ्ठल गोरख कोळी, महिला संघटक ललिता भालेराव, शरद महाजन, कार्यकारीणी सदस्य प्रमोद तावडे, मुकेश पाटील, उमेश पाटील, समाधान अडकमोल, मेहमूद तडवी, दीपाली धनगर, मुक्ता गोसावी, छगन बारेला, सल्लागार गोकुळ शंकपाळ, कैलास साळुंखे, मनोज देशमुख, चंद्रकांत पाटील, यांची निवड करण्यात आली. प्रसंगी यावल विभागातील सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.