भुसावळकरांना मोठा दिलासा : पांडुरंग टॉकीज ते नाहाटा चौफुली मार्गाचे काँक्रिटीकरण

शहराच्या सौंदर्यात पडेल भर : नाहाटा महाविद्यालयाच्यादक्षिणेकडील भागामध्ये वाढणार्‍या वसाहतींना फायदा


Big relief for Bhusawal residents : The road from Pandurang Talkies to Nahata Chowk will be concreted भुसावळ (3 जानेवारी 2026) : शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज (महाराजा अग्रसेन चौक) ते नाहाटा चौफुली या मार्गाचे काँक्रिटीकरण काम या नवीन वर्षांत पूर्ण होणार असल्याने शहरवासीयांना नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे.

राज्य हद्द विटवा, भुसावळ, जामनेर, फत्तेपूर, मोताळा, तारवाडी फाटा, पिंपळगाव राजा, खामगाव रस्ता राष्ट्रीय महामार्ग 44 कि. मी. 45/200 ते 76/771 चे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू असून या मार्गात समाविष्ट असलेल्या पांडुरंग टॉकीज ते नाहाटा चौफुली या मार्गाचे काँक्रिटीकरणाचा समावेश आहे. यासोबतच नाहाटा महाविद्यालयाच्या दक्षिणेकडील भागात शहराचा विस्तार होणार आहे.



प्रत्यक्ष कामाला सुरूवात
राज्य सीमा विटवा भुसावळ जामनेर या मार्गाचे 44 किलोमीटर 50/100 ते 58/100 (जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिर ते चोरवड गावापर्यंत) या मार्गाचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता तर राज्य सीमा विटवा भुसावळ जामनेर या 45/200 ते 75/500 चे काँक्रिटीकरण व मजबुतीकरण कामासाठी (यावल रोड, गांधी पुतळा ते जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरापर्यंतचा मार्ग) 182 कोटी रुपये निधी मंजूर आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे.

जामनेर रोडवर नाहाटा महाविद्यालय ते चोरवड पूर्वीच्या काँक्रिटीकरण रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले तर पुढील गजानन महाराज मंदिर ते चोरवड पर्यंतच्या रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. चोरवड गावापर्यंत हा रस्ता काँक्रिटीकरण होईल. यासोबतच हा मार्ग शहरातून जात असल्याने जामनेर रोडच्या कामाचे या वर्षात काँक्रिटीकरण केले जाणार आहे.

चार महिन्यांत होईल काम पूर्ण
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून भुसावळ ते जामनेर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावरील भुसावळ शहरात नाहाटा चौक ते पांडुरंग टॉकीज चौकाच्या जामनेर रोडचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरवात होईल. चार ते पाच महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. शहरातील हे एक महत्वाचे काम पूर्ण होणार आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !