भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
Savitribai Phule’s birth anniversary was celebrated at Tapati Public School in Bhusawal भुसावळ (3 जानेवारी 2026) : भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस स्कुलच्या प्रिंसीपल नीना कटलर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले
यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारे जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्याच बरोबर त्या समाज सुधारक आणि कवयित्रीदेखील होत्या. त्यांनी पती ज्योतीराव फुले यांच्यासोबत मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी महत्वपूर्ण कार्य केले. 1848 मध्ये पुणे येथे पहिली मुलींची शाळा उघडली आणि समाजातील अनिष्ट रुढींविरुद्ध आवाज उठवून स्त्री-शिक्षणाचा पाया रचला. त्यांना आधुनिक भारतातील श्रीवादी चळवळीची प्रनेते मानले जाते. या प्रसंगी स्कुलच्या व्हाईस प्रिंसीपल श्रद्धाली घूले, मनप्रीत कौर, प्रतिभा काकडे, हर्षला चौधरी, वर्षा काळे व इयत्ता आठवी ,नववी, दहावीच्या विद्यार्थीनी तसेच इतर शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संगीता बर्हाटे, रोहिणी पाटील यांनी परिश्रम घेतले.









