मोटार वाहन कायदा दुरुस्तीला अखेर मंजुरी


मोटार वाहन संशोधन विधेयक राज्यसभेत 13 विरुद्ध 108 मतांनी मंजूर

नवी दिल्ली – रस्ते अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्यातील कडक तरतुदींवर राज्यसभेनेही नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे. मोटार वाहन संशोधन विधेयक राज्यसभेत 13 विरुद्ध 108 मतांनी मंजूर झाले. ऑगस्टच्या मध्यापर्यंत हा नवा कायदा लागू होईल. रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तीन तास राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली. र

या तरतुदींना मिळाली मान्यता
अल्पवयीन मुलांच्या हातून अपघात झाला तर पालकांना 3 वर्षे तुरुंगवास. 25 हजार दंड. परवानाही रद्द होणार, दंडाची रक्कमही अनेक पट वाढली. मद्यप्राशन करून गाडी चालवली तर 2 हजारऐवजी 10 हजार दंड, गाडीचा थर्ड पार्टी विमा असणेही आवश्यक, हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झाल्यास 25 हजार ऐवजी 2 लाखांची भरपाई द्यावी लागेल, विना हेल्मेट दुचाकी चालवली तर तीन महिने परवाना निलंबित. दोनपेक्षा अधिक जण गाडीवर असतील तर 2 हजार रुपये दंड, रुग्णवाहिकांना रस्ता दिला नाही तर 1 हजार रुपये दंड, मोटार व्हेईकल फंड उभा करून त्यातून अपघातांतील जखमींवर उपचार केले जातील. मृत्यू झाल्यास भरपाई दिली जाणार आहे.


कॉपी करू नका.