भुसावळातील हिंदी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केले कलागुणांचे सादरीकरण
भुसावळ (10 जानेवारी 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात शनिवार, 10 जानेवारी 2026 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी सांस्कृतिक विभागाच्या प्रा.अनुपम शर्मा व प्रा.ज्योती ओस्तवाल यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उत्सव कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वप्रथम हिंदी सेवा मंडळाचे कार्याध्यक्षसत्यनारायण गोडीयाले, गोपाल दाजी अग्रवाल, उपाध्यक्ष हिंदी सेवा मंडळ व प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मान्यवरांनी केले सरस्वती पूजन
हिंदी सेवा मंडळाचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुधीर शर्मा यांनी केले. युवा उत्सव अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी एकल डान्स, सोलो डान्स, रिमिक्स डान्स, देशभक्तीपर गीत यावर डान्स, तसेच सायबर सुरक्षितता यावर एक सुंदर नाटीका सादर करण्यात आली.

महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी सर्व प्रस्तुतीचे सादरीकरण उत्कृष्टरित्या केले. पदाधिकार्यांनी भाग घेणार्या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा.ज्योती ओस्तवाल तर आभार प्रा.अनुपम शर्मा यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.

