भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात
भुसावळ (11 जानेवारी 2026) : स्काऊट गाईड युनिटतर्फे शहरातील के.नारखेडे विद्यालयामध्ये शुक्रवार, 9 जानेवारी 2026 रोजी आनंद मेळाव्या अंतर्गत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील साहेब यांच्याहस्ते तसेच प्रमुख अतिथी संस्था सदस्य विकास पाचपांडे, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे यांच्या उपस्थितीत स्टॉल वरील खाद्यपदार्थांची खरेदी करून करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.पी.पाठक, एस.एल.राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, भाऊसाहेब प्रमोद तळेले, बी.बी.जोगी, एस.एस.कापसे, यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकातून एस. एम. चिपळूणकर यांनी आनंद मेळाव्यामागील हेतू स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मिळणार्या व्यवहार ज्ञानाचे महत्त्व सांगितले. विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातील सर्व 28 स्टॉल्स वरील विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद लुटला. खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याची संधी विद्यार्थ्यांना यातून प्राप्त झाली.

यांचे मेळाव्यासाठी परिश्रम
आनंद मेळाव्याच्या नियोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी एस.एम.चिपळूणकर, एस.पी.महाजन, मनोज कुलकर्णी माधव गरुडे, निळकंठ खाचणे, प्रतिभा पाटील, स्वाती इखे, वर्षा कुरकुरे, सोनाली राणे, कांचन राणे, संदीप पाटील, शैलेंद्र वासकर, प्रदीप सपकाळे , निलेश नेहेते यांनी परिश्रम घेतले.

