भुसावळातील ब्राम्हण संघातर्फे 23 रोजी सामूहिक व्रतबंध सोहळा
भुसावळ (11 जानेवारी 2026) : शहरातील ब्राह्मण संघात दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार, 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सामूहिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन ब्राह्मण संघातर्फे केले आहे.
सामूहिक व्रतबंध सोहळ्याच्या कार्यक्रम 23 रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. यावेळी व्रतबंधाचे सर्व धार्मिक विधी पूर्ण केले जातील. ज्या समाजबांधवाना व्रतबंध सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 15 जानेवारीपर्यंत व्रतबंध नाव नोंदणीसाठी ब्राह्मण संघ कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे.


