दिगंबर जैन मुनींचे भुसावळात आगमन ; शहर भक्तिभावाने दुमदुमले
प.पू. 108 श्री विभवसागर महाराजांसह 20 पिच्छी मुनी-आर्यिका संघाचे पायी विहाराने आगमन
भुसावळ (11 जानेवारी 2026) : भुसावळ शहरात शनिवारी भारत गौरव, दिगंबर जैन मुनी प.पू.सारस्वताचार्य 108 श्री विभवसागरजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत समस्त मुनी संघ व आर्यिका संघ (20 पिच्छी) यांचे भव्य आणि भक्तिभावपूर्ण आगमन झाले. यावेळी शहरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
पायी विहार करीत जैन मुनी दाखल
शनिवारी सकाळी सावदा येथून पायी विहार करत मुनी संघ भुसावळात दाखल झाला. गांधी पुतळयाजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले, महाराणा प्रताप चौक, लोखंडी पूल, मरी माता मंदिर मार्गे मुनी संघाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक जय जिनेंद्रच्या घोषात महाराजांचे स्वागत करत होते.फुलवृष्टी, आरती आणि भक्तीगीतांनी परिसर भारावून गेला होता.

शोभायात्रेनंतर मुनी संघ आठवडे बाजार येथील दिगंबर जैन मंदिरात विराजमान झाला. यावेळी सकल जैन समाज भुसावळतर्फे महाराजांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. समाज बांधवांसह विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प.पू. 108 श्री विभवसागरजी महाराजांच्या आगमनाने भाविकांमध्ये उत्साह होता. पुढील प्रवचने व धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पावन प्रसंगामुळे शहरात अध्यात्मिक ऊर्जा आणि शांततेचा संदेश पसरल्याचे भाविकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सकल जैन समाजाच्या राष्ट्रीय जैन सेना, श्री दिगंबर जैन युवा मंच, जिन याक्षिणी सुनबाई मंडळ, समता बहुमंडळ, अ.दी. महिला महासमिती, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, तेरापंथ जैन समाज, अखिल भारतीय अल्पसंख्यांक महासंघच्या पदाधिकारीव कार्यकर्ते व ट्रस्टी बोर्ड यांनी परिश्रम घेतले.

