इंदूरमध्ये भीषण अपघातात माजी गृहमंत्र्यांच्या कन्येसह तिघे ठार


इंदौर (11 जानेवारी 2026) : डंपर व कारच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची मुलगी प्रेरणा बच्चन (26) यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, 11 रोजी सकाळी घडली. शुक्रवारी पहाटे इंदूरमध्ये हा अपघात झाला. या अपघातात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर कासलीवाल (25) आणि त्यांचा साथीदार मानसंधू (26) यांचाही जागीच मृत्यू झाला.

गंभीर जखमी झालेल्या अनुष्का राठी या तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डंपरने धडक दिल्यानंतर कारच्या मागच्या सीटवर बसलेली प्रेरणा बच्चन बोनेटवर फेकली गेली यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. तिचा मृतदेह बोनेटवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात रेकॉर्ड केलेल्या वेळेनुसार, शुक्रवारी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. हे तिन्ही फुटेज हृदयद्रावक आहेत. तब्बल 130 च्या वेगाने जाणारी कार स्पष्टपणे दिसत सुद्धा नाही परंतु अपघातापूर्वी आवाज ऐकू येतो. कार आणि डंपरच्या धडकेचा आवाज ऐकू येतो. पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, 130-140 किमी/तास वेगाने गाडी चालवणारा तरुण दारूच्या नशेत होता.

पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, गाडी खूप वेगाने जात होती. तथापि, खरा वेग अद्याप निश्चित झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेजनुसार, टक्कर होण्याच्या फक्त सहा सेकंद आधी चालकाने ब्रेक लावला. ब्रेक लावताना, गाडी स्लीप होऊन डंपरला धडकली आणि त्यानंतर मोठा आवाज झाला.

तेजाजी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र मरकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एफएसएल टीम घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. कारला धडकलेल्या डंपरच्या मागील बाजूस प्रेरणाचे केस आणि मांसाचे तुकडे आढळले. याचे नमुने चाचणीसाठी जतन करण्यात आले आहेत. यावरून पुष्टी होते की टक्करच्या वेळी प्रेरणा थेट डंपरला धडकली. दोन्ही डंपर चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

अपघातानंतर प्रसिद्ध झालेल्या फोटोंवरून आणि तपासात असे दिसून आले आहे की, प्रेरणा मागच्या सीटच्या मध्यभागी बसली होती आणि तिने सीट बेल्ट लावला नव्हता त्यावेळी ती मित्रांशी बोलत असण्याची शक्यता आहे. जोरदार धडकेमुळे ती पुढे फेकली गेली, गाडीचा पुढचा भाग ओलांडला आणि डंपरला धडकली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तज्ञांच्या मते, नवीन मॉडेल्सच्या कारमध्ये मागच्या सीटवर तीन सीट बेल्ट देखील आहेत: बाजूच्या प्रवाशांसाठी दोन आणि मधल्या प्रवाशांसाठी एक. भारतात, आता मागच्या सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट अनिवार्य आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !