भुसावळातील सुरभी नगरात गणेश जयंती दिनी नवसाचा गणपति मंदिराचा रौप्य महोत्सव

दोन दिवस भरगच्च भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन


भुसावळ (12 जानेवारी 2026) : भुसावळ शहरातील सुरभी नगरात नवसाचा गणपती मंदिरास 25 वर्ष पूर्ण झाल्याने तसेच 22 जानेवारी रोजी असलेल्या गणेश जयंती निमित्ताने सुरभी नगरच्या मंदिरात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, 21 जानेवारी तसेच गुरुवार, 22 जानेवारी रोजी दिवसभर विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे. यामध्ये श्री गणेश याग, सामूहिक गणपति अथर्वशीर्ष पठन, देवेंद्र ठाकुर यांची भजन संध्या, श्री गणपती महाभिषेक, सत्यनारायण पूजा, नवसाच्या गणपतीची सवाद्य पालखी मिरवणूक, महाप्रसाद (भंडारा), त्रिपदी भजन सेवा व ह.भ.प श्री.भरत महाराज म्हैसवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.

अधिकाधिक गणेशभक्तांनी या कार्यक्रमास उपस्थिती देवून श्री नवसाच्या गणपतीच्या सेवेची संधी व आशिर्वाद प्राप्त करावे, असे मंदिर समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !