भुसावळातील एन.के.नारखेडे स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात


भुसावळ (12 जानेवारी 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सोमवार, 12 रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे ऑननरी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापिका

अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
शाळेतील शिक्षिका वंदना नेमाडे यांनी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांनी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !