यावल पोलिसांची फॅन्सी क्रमांक असलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई
नवीन नंबर प्लेट बसवल्यानंतरच सोडल्या दुचाकी
Yawal police take action against two-wheeler vehicles with fancy number plates यावल (12 जानेवारी 2026) : यावल शहरात शनिवारी येथील वाहतूक पोलीस पथकाच्या वतीने विना क्रमांक तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहन धारकांविरुद्धच्या दंडात्मक कारवाई केली. हाय सेक्युरेटी आरटीओ प्रमाणीत नंबर प्लेट बसवल्यानंतरच दुचाकी सोडण्यात आल्या.
कारवाईने वाहनधारकांमध्ये खळबळ
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत 64 दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईत करण्यात आली. यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनधारकांवर कारवाईची विशेष मोहिम राबवण्यात आली.

बुधवारपासून ते थेट शनिवारपर्यंत चार दिवसात तब्बल 64 वाहन धारकांना दंड ठोठावण्यात आला. दंड भरल्यानंतर देखील आरटीओ प्रमाणीत हाय सेक्युरीटी नंबर प्लेट बसवल्यानंतरचं दुचाकी सोडण्यात आल्या. शहरातील बुरूज चौक, भुसावळ टी-पॉईट, फैजपूर रोड, चोपडा नाका या ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांकडून चेेक पॉईट लावण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस कर्मचारी अर्षद गवळी, दिवाकर जोशी, सचिन पोळ, पोलीस कर्मचारी अनिल पाटील, पोलीस कर्मचारी मुकेश पाटील यांच्यासह आदी पोलीस कर्मचार्यांच्या सहभागाने यावल शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहिम राबवण्यात येत आहे.

