निंभोरा पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान


The Nimbhora Police Station honored journalists on the occasion of Journalists’ Day खिर्डी, ता.रावेर (12 जानेवारी 2026) : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त 6 जानेवारी हा दिवस राज्यात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पत्रकार दिनाचे औचित्य साधत निंभोरा पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील पत्रकार यांचा सत्कार, सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

जातीय सलोखा राखण्यास मदत : मीरा देशमुख
पत्रकार हा सर्वांचा मित्र असून तो कधीही कुणाचा शत्रू नसतो. पत्रकार, लोकप्रतिनिधी, पोलीस, जनता यांचा नेहमी सुसंवाद असल्यास सहज प्रश्न सुटून नेहमी शांतता जातीय सलोखा राहून न्याय मिळण्यास मदत होते, असे सहा.निरीक्षक मीरा देशमुख म्हणाल्या.

यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार सहाय्यक निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, ज्ञानेश्वर महाजन, प्रवीण धुंदले ,विनायक जहुरे , इकबाल पिंजारी, इद्रिस शेख, कांतीलाल गाढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अवसरमल, भीमराव कोचुरे, सुमित पाटील, प्रभाकर महाजन, जमील शेख, दस्तगीर खाटीक, राहुल जैन, दस्तगीर खाटीक, राहुल जैन, विनोद कोळी, उमेश तायडे, जमील शेख, छगन पाटील, संजय पाटील, सरदार पिंजारी यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे तर सूत्रसंचालन अमोल वाघ व आभार कांतीलाल गाढे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !