भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये मकर संक्रांत उत्सव उत्साहात


भुसावळ (13 जानेवारी 2026) : कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये मकर संक्रात उत्सव साजरा करण्यात आला. मंगळवार, 13 रोजी नववर्षाच्या सुरवातीला येणारा पतंगोत्त्सव म्हणजेच मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला

मकर संक्रांतीला होणार्‍या भोगौलिक बदलाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. काही विद्यार्थ्यांनी संक्राती का व कशी साजरी केली जाते याबाबत उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाअंती विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याचा आणि तिळगुळ वाटण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमास शाळेच्या पर्यवेक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !