जळगावात पैशांच्या वादातून गोळीबार ; तक्रारदार बचावला
ऐन निवडणुकीच्या दिवशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
A shooting occurred in Jalgaon over a money dispute; the complainant survived जळगाव (15 जानेवारी 2026) : जळगाव महापालिकेची गुरुवारी धामधूम स्सुरू असतानाच दुसरीकडे पिंप्राळा परिसरातील आनंद मंगल सोसायटीजवळील हनुमान मंदिराजवळ वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मिस्त्री कामाच्या थकीत पैशांच्या वादातून हा प्रकार गोळीबार झाला असलातरी सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.
वाद उफाळताच गोळीबार
संशयित तुषार सोनवणे याच्याकडून मिस्त्री कामाचे अंदाजे एक लाख 70 हजार रुपये मुस्तफाकडे थकले होते. वारंवार मागणी करूनही मुस्तफा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गुरुवारी मतदानाच्या दिवशी आनंद मंगल सोसायटी येथील हनुमान मंदिराजवळ मुस्तफा आणि तुषार सोनवणे हे समोरासमोर आले. यावेळेला पैसे देवाणघेवाणीचा वाद पुन्हा उफाळला. संतापलेल्या तुषार सोनवणे याने गुरुवारी मुस्तफावर गोळीबार केला.

वैयक्तिक वादातून गोळीबार : अपर पोलिस अधीक्षक
घटनास्थळी पोलिसांना बंदुकीची रिकामी पुंगळी सापडली आहे. हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक वादातून झाला असून, सुरू असलेल्या निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्पष्ट केले आहे.
अधिकार्यांची धाव
गोळीबारानंतर जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
फिर्यादी मुस्तफा याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयीताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः फिर्यादीकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. दोन्ही व्यक्ती पिंप्राळा परिसरातील रहिवासी असून या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

