!-- afp header code starts here -->

भुसावळातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीतून 36 लाखांचे बायोडिझेलसदृश इंधन जप्त


Biodiesel-like fuel worth 36 lakhs was seized from the ‘Namo Energy Oil’ company in Bhusawal. भुसावळ (19 जानेवारी 2026) :  भुसावळ तालुक्यातील किन्ही शिवपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामातून भुसावळ तालुका पोलीस व पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात 36 लाखांचा बायोडिझेलसदृश साठा जप्त केला आहे. हे इंधन बायोडिझेल आहे वा नाही? याबाबत तपासणीचा अहवाल आल्यानंतरच स्पष्टता येणार आहे मात्र ज्वलनशील इंधन जप्त झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट नंबर 50/51 वरील ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तेथे एक टँकर उभा असून त्यात बायोडिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ त्यात असल्याची माहिती मिळताच यंत्रणा कामाला लागली. तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष रविवारी कंपनीच्या आवारात धडक दिली.

30 हजार लीटर ज्वलनशील इंधन जप्त
या कारवाईदरम्यान कंपनीच्या आवारात उभ्या असलेल्या जी.जे. 24 व्ही. 7655 या क्रमांकाच्या टँकरमध्ये सुमारे 30 हजार लिटर बायोडिझेलसदृश द्रवाचा साठा केल्याचे निदर्शनास आले. टँकरमधील द्रव पदार्थाची घनता 712 इतकी असून तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हा द्रव पदार्थ बायोडिझेल आहे किंवा अन्य इंधन? याची खात्री करण्यासाठी नमुने घेण्यात आले. त्यांची रासायनिक तपासणी दरम्यान कंपनी मालकांच्या नातेवाईकांनी हा टँकर भाडेतत्त्वावर घेतल्याचे सांगितले मात्र कारवाई झाली तेव्हा टँकर चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता.

या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचा टँकर आणि 21 लाख रुपये किंमतीचे 30 हजार लिटर इंधन (70 रुपये प्रति लिटर दराने) असा एकूण 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा टँकर आता भुसावळ तालुका पोलिसात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !