भुसावळातील हिंदी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व वसंत पंचमी उत्साहात


भुसावळ (23 जानेवारी 2026) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व वसंत पंचमी साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्या हस्ते नेताजी बोस व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.रमेश जोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. तसेच आजाद हिंद फौजची स्थापना केली. त्यांच्याद्वारे जय हिंद हा नारा देण्यात आला. त्याद्वारे युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले.

याप्रसंगी समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !