अमळनेर शहरातील अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांची मोठी कारवाई : 11 अटकेत तर सहा संशयीत पसार
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व अमळनेर पोलिसांची संयुक्त कारवाई : 1,575 किलो गोमांस जप्त तर तीन गुरांची सुटका
अचानक केली छापेमारी
जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते (अमळनेर) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आणि अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात अचानक छापेमारी करण्यात आली.

गोमांस जप्त : तीन गुरांची सुटका
अमळनेरच्या पारधीवाडा परिसरात मुस्लिम कब्रस्तानाच्या पाठीमागील कत्तलखान्यात तसेच जपान जिन परिसरातील पत्रा शेडमध्ये बेकायदेशीररित्या गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शुक्रवार, 3 जुलै रोजी संयुक्त छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान गोमांस, जिवंत बैल आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी अवजारे जप्त करण्यात आली. पथकाने यावेळी घटनास्थळावरून तीन लाख 15 हजार रुपये किंमतीचे 1575 किलो गोमांस, एक लाख 55 हजार रुपये किंमतीचे तीन गावठी बैल तसेच तीन हजार रुपये किंमतीच्या चार लोखंडी कुर्हाडी, नऊ सुर्या व सहा कोयते तसेच दोन वजन काटे जप्त करण्यात आले. एकूण चार लाख 73 हजारांचा
11 आरोपींना अटक : सहा पसार
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयीत हसनखान गुलाबखान पठाण (65), मोहसीनखान हसनखान पठाण (35), फराजखान हमीदखान कुरेशी (20), अर्षदखान अजीजखान कुरेशी (48), रियाज अहमद अब्दुल शकुर कुरेशी (55), तन्वीर शेख ताहेर कुरेशी (41), जावेदखान सुलेमानखान कुरेशी (50), अब्दुल शेख नुरा कुरेशी (50), अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी (56), शरीफ शेख अकबर कुरेशी (25) यांना अटक करण्यात आली तर संशयीत इकबाल शेख आहत शेख कुरेशी, जहांगीर शेख साबीर शेख कुरेशी, आरीफ अजीज कुरेशी, जाबीर खान अब्बासखान कुरेशी, जहीरखान जाबीरखान कुरेशी हे पसार झाले.
यांनी केली कारवाई
या कारवाईत कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलिस कर्मचारी हरीलाल पाटील, विलेश सोनवणे, रवींद्र पाटील, दीपक माळी, सचिन घुगे, मयूर निकम, राहुल कोळी, विलास गायकवाड तसेच अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज आदींच्या पथकाने केली.
