भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग


K. Narkhede School from Bhusawal participated in the state-level competition भुसावळ (24 जानेवारी 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयाच्या शिक्षकांनी शुक्रवार, 23 रोजी मातृ मंदिर विश्वस्त संस्था, निगडी, जि. पुणेद्वारा आयोजित राज्यस्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत सहभाग नोंदवला.

विद्यालयातील सकाळ शाखेतील इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा समूह गीत गायन स्पर्धेत सहभाग घेऊन ‘पुन्हा नव्याने नव्या दिल्याने गाणे गाऊया’ या गीताचे उत्कृष्ट समूह गायन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील संगीत शिक्षक डी.एम.हेलोडे, एम.व्ही.कुलकर्णी यांनी संगीत साथ दिली.

राज्यस्तरीय समूह गायन स्पर्धेत विद्यालयातील शिक्षकांनी सुद्धा सहभाग नोंदविला. त्यात मनोज कुलकर्णी, डी.एम.हेलोडे, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, अनिल जटाळे, सुहास चौधरी, शैलेंद्र महाजन, शशिकांत झांबरे, नवीन नेमाडे, प्रतिभा पाटील, शुभांगी पाटील, वैशाली महाजन, तेजस्विनी नेमाडे, चेतना खडसे, धनश्री पाटील या सर्व शिक्षक बंधू भगिनिंनी ‘जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे’ या गीताचे उत्कृष्ट समूह गीतगायन केले.

या स्पर्धेचे परीक्षण संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर सावंत व चोपड्यातील विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले. परीक्षकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी व शिक्षकांच्या समूह गायनाचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा व आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करावा असे मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक सुनील राणे, एस.पी.पाठक, संगणक शिक्षिका राजश्री लोखंडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन
मनोज कुलकर्णी यांनी तर आभार पर्यवेक्षक एस.पी.पाठक सर यांनी केले. संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी मनोज कुलकर्णी आणि डी.एम.हेलोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !