भुसावळातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी पालिका प्रशासनासह नगराध्यक्षा सकारात्मक

वंचित बहुजन आघाडीने घेतली मुख्याधिकारी, नगराध्यक्षांची भेट


The municipal administration and the mayor are positive about the rehabilitation of railway encroachers in Bhusawal भुसावळ (24 जानेवारी 2026) : शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पूर्नवसनासाठी तातडीने प्रयत्न करावेत, गेल्या काळात शहरातील सर्वे नंबर 63/1 या शासकिय भुखंडावर पूर्नवसन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते, त्या आदेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीने मुख्याधिकारी विवेक धांडे व लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची भेट घेवून निवेदन दिले. मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

पालिकेत वंचित आघाडीच्या पदाधिकार्‍यांची चर्चा
वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमणधारकांनी भुसावळ पालिकेत अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. वंचित बहुजन आघाडीने ऑगस्ट महिन्यात भुसावळ येथील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ शहरातील सर्वे नंबर 63/1 या शासकीय भूखंडावर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आदेशाप्रमाणे भुसावळ नगरपालिकेने पुनर्वसन प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती परंतु नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे पुनर्वसन प्रक्रियेला पूर्णतः ब्रेक लागला.

याबाबत चर्चा करून पुनर्वसन प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा संघटक बबन कांबळे, माजी तालुकाध्यक्ष रुपेश साळुंके, सामाजिक कार्यकर्ते संगीत खरे यांची उपस्थिती होती.

सीओ, नगराध्यक्षा सकारात्मक
मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी अतिक्रमणधारकांच्या पुर्नवसनासाठी सकारात्मकता दाखवली आहे. तातडीने सदर भूखंडाच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख यांना पत्रव्यवहार करण्यात आला. पुढील अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी दिनेश नरवाडे, अनुप बनसोडे, मथुरा पवार, प्रदीप भालेराव, सुरेंद्र बागुल, गंगुबाई बागुल, महेंद्र मोरे यांच्यासह अनेक अतिक्रमणधारक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !