किनगाव बुद्रुकचे माजी सरपंचाविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा
यावल (24 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक या गावातील माजी सरपंच यांनी आदिवासी नगरात रस्त्यावरून जात असतांना आदिवासी जमातीच्या महिला व मुलांना अश्लील शिवीगाळ केली व त्यांना जाती वाचक बोलून धमकी दिली. ही घटना 19 ऑक्टोबर 2025 रोजी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार, 21 जानेवारी 2026 रोजी अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण ?
तक्रारदार किनगाव बुद्रुक, ता.यावल या गावातील रहिवासी अनुसूचित जमातीच्या एका 35 वर्षीय तरुणाने यावल पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच मिलिंद प्रभाकर चौधरी यांनी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे दहा वाजता आदिवासी नगरातून ते जात असतांना तेथे खेळत असलेल्या आदिवासी जमातीच्या मुलांना व महिलांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांना गाडीखाली चेेंदून टाकील, पुन्हा गाडी समोर आले तर विहिरीत टाकून मारून टाकेल, अशी धमकी दिली होती.
याबाबत यावल पोलीस ठाण्यात प्रारंभी तक्रार देण्यात आली. मात्र, तिची दखल न घेतल्याने संबंधित तरुणाने आमरण उपोषणाचा इशारा दिला होता व त्यानंतर तरुणाच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात बुधवारी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर करीत आहे.

