भुसावळ-यावल बसमधून महिलेची सोन्याची पोत लांबवली : बस थेट पोलिस ठाण्यात


A woman’s gold necklace was stolen from a Bhusawal-Yawal bus ; the bus was taken directly to the police station यावल (24 जानेवारी 2026) : भुसावळ येथून यावल येणार्‍या बसमध्ये चिखली बुद्रुक येथील 28 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवण्यात आली. हा प्रकार गुरूवारी दुपारी अंजाळे या गावाजवळ उघडकीस आला. चालकाने अंजाळे येथून बस थेट यावल पोलीस ठाण्यात आणली व या ठिकाणी प्रवाशांची झडती घेण्यात आली. चार जणांवर संशय असून त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले.

गर्दीचा फायदा घेत चोरी
भुसावळ येथून यावल आगाराची बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल. 2714) घेऊन चालक मधुकर शंकपाळ हे यावलसाठी येत होते. या बसमध्ये वाहक हेमंत नाईक हे होते. बसमध्ये भुसावळ येथून शुभांगी लोमेश सावळे (28, चिखली बुद्रुक, ता.यावल) ही महिला बसली होती व ती अंजाळे येथे उतरणार होती. तिच्या गळ्यात तीन ग्रॅम सोन्याची पेंडल व मोती असलेली सोन्याची पोत होती. ही महिला अंजाळे बस स्थानकावर उतरत असतांना तिच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी झाल्याची तिच्या निदर्शनास आले व काळे मणी हे एसटी बसमध्ये विखुरलेले दिसले. तिने हा प्रकार चालक आणि वाहकास सांगितल्यानंतर तेथून एस.टी.बस ही सरळ यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

चौघे संशयीत ताब्यात
बसमध्ये 50 हुन अधिक प्रवासी होते तर दोन महिला आणि दोन पुरुषांवर अशा चौघांवर संशय होता. या चौघांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर बसमधील प्रवाशांची झडती घेण्यात आली आणि बस रवाना करण्यात आली. चार संशितांवर कारवाईसाठी पोलिसांनी थांबून ठेवले होते व उशिरापर्यंत पोलीस त्यांच्याकडे चौकशी करीत होते. प्रवासात महिलांनी आपले मौल्यवान दागिने सांभाळूनच प्रवास करावा, असे आवाहन यावल पोलिसांच्या वतीने करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !