भुसावळात ब्रह्माकुमारींकडून महाशिवरात्री सोहळा
13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान सहस्र शिवलिंग दर्शन कार्यक्रम
भुसावळ (13 फेब्रुवारी 2026) : महाशिवरात्री पर्वानिमित्त भुसावळ येथील ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान सायंकाळी 4 ते 9 या वेळेत श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे सहस्र शिवलिंग दर्शन व विविध आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत.
या काळात शिवज्ञान जागृती, ध्यान-साधना व आध्यात्मिक संदेशाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भुसावळ सेवाकेंद्राच्या मुख्य संचालिका बी.के. सिंधु दीदी यांनी केले आहे.







