केंद्रीय शिक्षक अभियोग्यता परीक्षेची प्रश्नपत्रिक एक जागतिक रेकॉर्ड : प्र.ह.दलाल यांचा दावा
भुसावळ (17 फेबु्रवारी 2026) : सी.बी.एस.ई.म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे सर्व भारतात शिक्षक प्राथमिक/ माध्यमिक शाळेत शिकविण्यास योग्य पात्रता धारक आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी सी.टी.ई.टी. ही परीक्षा आयोजित केली जाते. यंदा फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली परीक्षा मात्र एका वेगळ्याच कारणास्तव चर्चेचा, व चिंतनाचा विषय ठरली आहे ती तिच्या प्रश्नपत्रिकेमुळे!! ही प्रश्नपत्रिका की एक पुस्तक? असा पाहताक्षणी प्रश्नच पडला अनेकाना कारण ही प्रश्नपत्रिका होती सुमारे 100 पानांची!
150 प्रश्न व अडीच तासांचा वेळ
परीक्षेसाठी वेळ होता फक्त अडीच तास आणि प्रश्न होते 150.परीक्षा म्हटली की थोडे तरी मानसिक ताण तणाव असतोच. एव्हढ्या कमी वेळेत प्रश्न काळजीपूर्वक वाचणे, विचार करून योग्य उत्तर ओएमआर शीटवर नोंदविणे, त्यातच अशी अजब लांब लचक प्रश्नपत्रिका ,अवघड, बोजड भाषा, वाक्यरचना म्हणजे परीक्षार्थींना तारेवरची कसरतच होती त्यामुळे शेवटचे 25/30 प्रश्न केवळ खुणा करणे झाल्याने अनेकांचे खूप नुकसान झाले. परीक्षा ही विषय ज्ञान तपासणारी असावी मात्र ही तर जणू वाचन क्षमता तपासणारी वाटली.

या परीक्षेसाठी भारत भारतातून लाखो परीक्षार्थी 1000 / 500 रु शुल्क भरतात त्यामुळे जास्तीत जास्त परीक्षार्थींना नापास करून प्रत्येक वेळी करोडो रुपये मिळविणे हा तर उद्देश नाही ना? आधी शंका येते आयोजकांना ही परीक्षा म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच वाटते की काय? मात्र आपल्या शिक्षण क्षेत्राची वाटचाल विनाशाकडे तर चालली नाही ना, याबद्दल खंत वाटते! अशी भावना प्र. ह.दलाल यांनी व्यक्त केली आहे.







