के.एन.सी.टी.आय.एम.टी.एस.परीक्षेचा निकाल जाहीर
चौथीत तनुश्री काळे तर सातवीत हर्षित रत्नानी प्रथम
KNCTI MTS exam results announced भुसावळ (5 मार्च 2026) : शहरातील के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी संस्थेतर्फे जिल्हास्तरीय इयत्ता चौथी व इयत्ता सातवी साठी घेण्यात आलेल्या के.एन.सी.टी.आय. एम. टी. एस.परीक्षा 18 जानेवारी 2026 चा निकाल संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील यांच्याहस्ते के. नारखेडे विद्यालयाच्या आवारात जाहीर करण्यात आला.
यांनी पटकावला क्रमांक
इयत्ता चौथीत जिल्ह्यातून प्रथम तनुश्री राजेंद्र काळे (खाजगी प्राथमिक शाळा शिरसोली), द्वितीय- ओजस्वी मनोज पाटील (खाजगी प्राथमिक विद्यामंदिर, पिंपळगाव हरेश्वर), सातवी जिल्ह्यातून प्रथम- हर्षित रवी रत्नानी (सेंट अलॉयसीस हायस्कूल, भुसावळ), द्वितीय- महेश रवी कुकरेजा (सेंट अॅलॉयसीस हायस्कूल, भुसावळ).






यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, सहसेक्रेटरी विकास पाचपांडे, संस्थेचे सभासद प्रमोद नेमाडे, एमटीएस परीक्षा समिती प्रमुख बी.ए.पाटील, के.नारखेडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, तु.स.झोपे विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुनील वानखेडे, एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे उपस्थित होत्या.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी के.नारखेडे विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.पी.पाठक, मनोज कुलकर्णी, श्री.श.चिपळोणकर, राहुल भारंबे, शशिकांत झांबरे, चेतन ठोंबरे, गणेश जगताप, सी.बी.जोगी, प्रमोद तळेले, के.एन.सी.टी.आय. एम.टी.एस.लिपिक दिनेश गायकवाड, शुभम ढाके यांनी परिश्रम घेतले. एम.टी.एस.परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष श्री.किशोर नारखेडे, खजिनदार श्रीनिवास नारखेडे आदींनी अभिनंदन केले आहे.







