दोंडाईचा शहरातील घरफोडीची धुळे गुन्हे शाखेकडून उकल : स्थानिक आरोपीला अटक


Dondaicha Burglary Case Solved by Dhule Crime Branch: Local Accused Arrested दोंडाईचा (14 मार्च 2026) : दोंडाईचा शहरात झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक आरोपीला धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून घरफोडीतील 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. राजगुरु मोहन पाटील (20, रा.महादेवपुरा, दोंडाईचा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
दोंडाईचातील ओमप्रकाश पंडित सोनवणे (रा. राऊळ नगर, संतोषी माता मंदिराजवळ, दोंडाईचा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 29 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी चार ते रात्री 8.30 च्या दरम्यान घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून 47 हजारांचा ऐवज लांबवला. दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपासात धुळे गुन्हे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना एक संशयीत चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी नंदुरबार चौफुलीवर आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाला निर्देश मिळताच त्यास अटक करण्यात आली. राजगुरु मोहन पाटील (20, रा.महादेवपुरा, दोंडाईचा) असे अटकेतील आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून मंगळसूत्र, सोन्याची नथ, एअर रिंग, सोन्याचे पेंडल मिळून एकूण 18 हजारांचे सोने जप्त करण्यात आले.





यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण पारधी, अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !