सिंगल युज प्लॉस्टीकवर बंदी भुसावळात मात्र नियम धाब्यावर
प्लास्टिक वस्तू वापरामुळे शहराच्या अस्वच्छतेत भर : पालिका प्रशासनाला निवेदन
Ban on Single-Use Plastics: Rules Flouted in Bhusawal भुसावळ (25 मार्च 2026) : पर्यावरण रक्षणासाठी भारत सरकारने 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिक वर पूर्णपणे बंदी घातली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकच्या पाण्याची बॉटली, प्लास्टिक कप, प्लास्टिक प्लेट तसेच इतर प्लास्टिक जन्य वस्तू प्लास्टिक असे 120 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक कॅरीबॅगच्या अशा उत्पादन व विक्री तसेच वापर करण्यावर बंदी घातली असलीतरी शहरात मात्र या वस्तूंचा सर्रासपणे वापर सुरू आहे. या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी भुसावळ पालिका प्रशासनाकडे मनसेतर्फे करण्यात आली आहे.
शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर
भुसावळ शहरात प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर सर्रास सुरू आहे. भाजी विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, मांस विक्री व अन्य ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या वस्तूंचा वापर केला जात असून प्लास्टिकची विल्हेवाट लावणे कठीण होत आहे. शहरातील नाले, गटार तुंबतात. सर्व शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पहावयास मिळतो, प्लास्टिकमुळे नागरिक, लहान मुले यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. प्राण्यांचे व पक्ष्यांचे जीवन धोक्यात येते. भुसावळ पालिका प्रशासनाने शहरात 120 मायक्रोनपेक्षा कमी प्लास्टिक उत्पादन व विक्री तसेच उपयोग करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
उपमुख्याधिकारी परवेज शेख यांना निवेदन देण्यात आले. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, तालुका सचिव विलास कोळी, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, सुशील मोरे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




