जळगावात 29 मार्चूला ‘विशाल हिंदू मेळावा’

हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाचा संकल्प


जळगाव (25 मार्च 2026) : जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात येत्या रविवार, 29 मार्च 2026 रोजी एका भव्य विशाल हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज, श्रद्धा कॉलनी परिसरातील विविध सोसायट्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यांची असेल उपस्थिती
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मनोजी सावंत (जळगाव जिल्हा सहप्रचार प्रमुख, रा. स्व. संघ आणि संचालक, गुरुकृपा क्लासेस) मार्गदर्शन करतील. ह.भ.प. विलासजी महाराज सायगावकर यांचे आशिर्वचन यावेळी लाभणार आहे. रामानंद नगर परिसरातील चर्च रोड जळगाव येथील श्री गणेश मंदिर परिसर, गजानन सोसायटी परिसर, पारिजात संकुल जवळ येथे हा मेळावा रविवार, 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होईल.


मेळाव्याचे आयोजन सकल हिंदू समाज, श्रद्धा कॉलनी परिसराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यात गजानन सोसायटी, पार्वती नगर, रामानंद नगर, यशवंत नगर, अजिंठा सोसायटी, गायत्री नगर, धांडे नगर, विवेकानंद नगर, स्नेहल सोसायटी, अजिंक्य सोसायटी आणि सन्मित्र कॉलनी अशा विविध परिसरांतील नागरिकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. हिंदू समाजात सामाजिक समरसता आणि एकात्मता वाढवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !