पाच मजली ईमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली : सहा जणांचा मृत्यू


Five-Story Building Collapses Like a House of Cards : Six Dead दिल्ली (1 जून 2026) : दिल्लीच्या साकेत परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याच्या घटनेचा व्हिडिओ रविवारी समोर आला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिस आणि बचाव पथकांनी ढिगार्‍याखाली गाडल्या गेलेल्या 12 जणांना बाहेर काढले. यापैकी 10 जखमींना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अनेक विद्यार्थी ढिगार्‍याखाली अडकले
दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अनंत मित्तल यांनी सांगितले की, इमारत कोसळलेली जागा वैद्यकीय विद्यार्थ्यांची कॅन्टीन होती त्यामुळे अनेक विद्यार्थी ढिगार्‍याखाली अडकले. जखमींना रुग्णालयात त्वरित पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. एनडीआरएफ, डीडीएमए, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिस संयुक्तपणे मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी सांगितले की, बेकायदेशीर बांधकामात सहभागी असलेल्यांवर आणि अशा बांधकामांना परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. रेखा गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले, अशा सर्व अनधिकृत इमारती आणि जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !