भुसावळ विभागात रेल्वेची धडक मोहिम : 683 फुकट्या प्रवाशांकडून चार लाख 71 लाखांहून अधिक दंड वसूल
Intensive Railway Drive in Bhusawal Division: Over ₹4.71 Lakhs Collected in Fines from 683 Ticketless Travelers भुसावळ (18 जून 2026) : रेल्वेला वाढलेली गर्दी पाहता फुकट्या प्रवाशांचा उपद्रवही वाढल्याने सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येत होत्या. फुकट्या प्रवाशांना चाप बसण्यासाठी भुसावळ विभागातील आठ स्थानकावर बुधवार, 17 रोजी विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली. या माध्यमातून 683 प्रवाशांवर कारवाई करीत चार लाख 71 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
आठ स्थानकांवर मोहिम
भुसावळसह जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती येथे एकाच वेळी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रवाशांना वैध तिकीट घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करणे तसेच अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे हा होता. तपासणी मोहिमेत मुख्य वाणिज्य निरीक्षक, मुख्य तिकीट निरीक्षक, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक तसेच वाणिज्य विभागातील कर्मचार्यांसह एकूण 57 कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे आठ कर्मचारी सहभागी झाले.


अस्वच्छता पसरवणार्यांवरही कारवाई
या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एकूण 683 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली तर चार लाख 71 हजार 245 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, रेल्वे अधिनियमाच्या कलम 145(ब) अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविण्याशी संबंधित 21 प्रकरणांमध्ये कारवाई करून तीन हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला. स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या चार विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन जबाबदारीने व नियमांचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

